औरंगाबाद – शहरात ठिकठिकाणी झुंडशाही करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काल रात्री मिल कॉर्नर येथील पोलिस आयुक्तालयात समोरच तरुणांचे दोन गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस आयुक्तालय समोर गुंडगिरी करण्याची या टोळक्याची हिम्मत झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेदहा पावणे अकरा वाजेच्या दरम्यान दहा ते पंधरा जणांचा गट अचानक जमा झाला सुरुवातीला शिवीगाळ करून बाचाबाची सुरू असतानाच त्यांच्या तुफान हाणामारी सुरू झाली. एकमेकांना हाताच्या हाताने मारहाण सुरू असताना त्यातील काही जणांनी एकमेकांना जमिनीवर पडून पायाखाली तुडवने सुरू केले. पाहता पाहता बघ्यांची गर्दी झाली.
या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना कळताच ते कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पोलिस येत असल्याचे पाहून दोन्ही गटातील बहुतांश जणांनी पळ काढला. काही तरुणांना पोलिसांनी पकडून आयुक्तालयात नेले. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याविषयी ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र आयुक्तालय समोर असा प्रकार होता. याबद्दल पोलीस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.