Motorola Edge 30 : जगातील सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; 50 MP केमेरा अन बरंच काही, किती आहे किंमत?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola ने आपला Motorola Edge 30 हा नवीन स्मार्टफोन नुकताच भारतात लॉंच केलाय. हा जगातील पहिला सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन आहे असा दावा कंपनीने केला आहे. या मोबाईलची जाडी 6.799mm आहे. Motorola Edge 30 ची विक्री 19 मे रोजी दुपारी Flipkart, Reliance Digital आणि प्रमुख रिटेल स्टोअरवर सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन Meteor Grey आणि Aurora Green या दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

Motorola Edge 30

किती किंमत आहे ?

Motorola Edge 30 ची भारतातील किंमत 6GB RAM च्या बेस व्हेरिएंटसाठी 27,999 रुपये तर 8GB RAM मॉडेलसाठी 29,999 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. दोन्ही ओप्शनमध्ये ग्राहकांना 128GB स्टोरेज मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे HDFC बँक क्रेडिट कार्ड असेल तर ग्राहकांना यावर 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. ऑफरचा लाभ घेतल्यानंतर Motorola Edge 30 ची किंमत अनुक्रमे 25,999 रुपये आणि 27,999 रुपयांपर्यंत जाते.

Motorola Edge 30

Motorola Edge 30 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 30 स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच FHD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज, टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८G+ चिपसेट सपोर्टसह येतो. यामध्ये ८ जीबीपर्यंत LPDDR५ रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी Motorola Edge 30 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल सेंसर दिले आहेत. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

Motorola Edge 30

फोनमध्ये ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑप्टिकल इमेज स्टेबालइजेशन, एचडीआर१० व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा मिळते. पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट चार्जिंग सपोर्टसह ४०२० एमएएची लीथियम ऑयन बॅटरी दिली आहे. फोन यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतो. मोटोरोलाचा हा फोन अँड्राइड १२ आधारित नियर स्टॉकवर काम करतो. यावर ३ वर्ष सिक्योरिटी अपडेट मिळेल. ५जी कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे तर Motorola Edge 30 स्मार्टफोनमध्ये १३ ५जी बँड दिले आहेत. तसेच, WI-Fi ६E सपोर्ट मिळतो.

Motorola Edge 30

ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल

मागील कॅमेरामध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, मॅक्रो व्हिजनसह 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. दोन 50-मेगापिक्सेल सेन्सर 30fps वर 4K व्हिडिओ शूट करू शकतात, तर 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा 4K व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकतो.

Motorola Edge 30

Motorola Edge 30 वरील कॅमेरा अॅप ड्युअल कॅप्चर, स्पॉट कलर, नाईट व्हिजन (रॉ), ऑटो नाईट व्हिजन (रॉ), पोर्ट्रेट, कटआउट, फोटो मोडमध्ये लाइव्ह फिल्टर आणि पॅनोरामा सारखे मोड ऑफर करते. पॉवरसाठी, या नवीन Motorola Edge 30 मध्ये 4,020mAh बॅटरी देण्यात आली आहे. साइड-अनलॉक, बॉक्समधील चार्जर, 5G चे 13 बँड, वाय-फाय 6e, ब्लूटूथ 5.2, ड्युअल-सिम सपोर्ट आणि डॉल्बी अॅटमॉस आणि स्नॅपड्रॅगन साउंडसह स्टिरिओ स्पीकर यांचा इतर वैशिष्ट्यांमध्ये समावेश आहे.

Motorola Edge 30 Pro Full Specifications

Brand Motorola
Model Edge 30 Pro
Price in India ₹49,999
Release date 24th February 2022
Launched in India Yes
Form factor Touchscreen
Dimensions (mm) 163.06 x 75.95 x 8.79
Weight (g) 196.00
Battery capacity (mAh) 4800
Fast charging Proprietary
Colours Cosmos Blue, Stardust White

Check Official Site : Click Here

महत्वाच्या बातम्या –

KTM Duke Price : KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली; पहा नव्या किंमती

Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन

Prepaid Plans : वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन कोणता ???

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Jio Recharge : फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटी; एकदा केला की 1 वर्ष पहायची गरज नाही