माझ्यावर आरोप करणारे परमवीर सिंग कुठे आहेत? अनिल देशमुखांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  100 कोटींच्या मनीलॉंद्रीग प्रकरणी अडचणीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अनिल देशमुख थेट ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी एक विडिओ जारी करत आपली भूमिका थेट जनतेपर्यंत मांडली आहे. आपल्यावर आरोप करणारे परमबीर सिंह हे परदेशात पळून गेले आहेत. मी मात्र ईडीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख म्हणाले, मला ज्यावेळी ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला चौकशीत सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. पण जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा त्यांना सहकार्य केलेय. त्यांना प्रत्येकवेळा सांगितलं की माझी याचिका हायकोर्टात आहे. त्याची सुनावणी सुरु आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल. ईडीने जेव्हा माझ्या घरी छापे टाकले तेव्हा आमच्याकडून पूर्ण सहकार्य करण्यात आलं.

आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात आलो आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंह आज कुठे आहेत. याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्या बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. म्हणजे ज्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला. ते आरोप करणारे पळून गेले. आज परमबीर सिंह यांच्याविरोधात त्यांच्या खात्यातील पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

Leave a Comment