नवी दिल्ली । आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा आयडेंटिटी प्रूफ आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड ही पहिली गरज आहे. बँक खाते उघडायचे असो की कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, आधार मिळवायचा की एलपीजी सिलेंडरचे अनुदान घ्यायचे, आधार नंबरची मागणी जवळपास सर्वत्र असते.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर तुम्ही हे सोप्या मार्गाने जाणून घेऊ शकता. वास्तविक, आधार नंबर जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तपासण्यासाठी ही सुविधा पुरवते.
आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री कशी तपासावी ?
>> सर्वप्रथम तुम्हीआधार नंबर जारी करणारी संस्था UIDAI च्या https://resident.uidai.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.
>> यानंतर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.
>> आता तुमचा आधार क्रमांक आणि सिक्योरिटी कोड टाका.
>> त्यानंतर ‘Generate OTP’ वर क्लिक करा
>> OTP टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि ट्रान्सझॅक्शन नंबर द्यावे लागेल.
>> आता निवडलेल्या कालावधीसाठी ऑथेंटिकेशन रीक्वेस्टचे डिटेल्स स्क्रीनवर दिसून येतील.
तुम्हाला तुमच्या आधारच्या वापरामध्ये काही गैरवापर झाल्याचा संशय असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास, तुम्ही ताबडतोब UIDAI टोल फ्री नंबर – 1947 वर किंवा [email protected] येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.