व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू; राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीकडून ncb अधिकारी समीर वानखेडे याना लक्ष केलं जातं असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

राणे म्हणाले की, भाजपकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो ओसामा बिन लादेन आहे का, असा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता. आता आम्ही विचारतो वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहेत का? तुम्हाला वानखेडेंवर राग आहे, तर सचिन वाझेवर इतके प्रेम का? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का??

शिवसेना नेहमी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत असते . आता मात्र मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. शाहरूख खान कडे इतका पैसा आहे की त्याने नवाब मलिक आणि संजय राऊत यांना भाड्याने घेतलं आहे असा टोला नितेश राणे यांनी लगावला. तसेच हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिला.