औरंगाबाद | कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांची पदमपुरा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी होत आहे. संसर्गाचा धोका असल्याने गर्दी करू नये. सोमवार पासून मनपाची सहा पथके तैनात केली जाणार आहेत. त्यांच्या मार्फत तपासणी करावी असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी केले.
सध्या शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी पदमपुरा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात नागरिकांसोबत व्यापारी व दुकानदाराची गर्दी होत आहे . या ठिकाणी होम आयसोलेशन वार्ड असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी येत असतात त्याचा संसर्ग होऊन रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे .म्हणून व्यापारी व दुकानदारांनी पदमपुरा येथील महानगरपालिका रुग्णालयात गर्दी करू नये.
ज्यांना कोविड चाचणी करून घ्यायची असेल त्यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार खाजगी लॅब मधून चाचणी करून घ्यावी. येत्या सोमवारपासून महानगरपालिकेच्या वतीने सहा टीम उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत कोरोणा चाचणी करून घ्यावी. असे आवाहनही पाडळकर यांनी केले आहे.
या ठिकाणी असतील पथके…….
१ फॅशन बाजार साजन सरिता समोर टिळक पथ पैठणगेट
२ पाटीदारर भवन जालना रोड
३ अग्रसेन भवन कॅनॉट प्लेस
4 जिजाई हॉस्पिटल गजानन मंदिर गारखेडा परिसर ,
५ अपना बाजार जालना रोड
६ बालाजी धर्मशाळा शहागंज
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा