शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखायला लागले? भाजप नेत्याचे वक्तव्य

पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर होणार ?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर एकीकडे भाजपचे प्रमुख नेते फोन करुन त्यांची विचारपूस करत असताना दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी मात्र पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी केलेल्या आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे कि ‘ सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, ‘दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है’. तसेच शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली.

आता जिंदाल यांनी केलेल्या ट्विटवरून पुन्हा भाजपमढील नेत्यांच्या मनामध्ये पवारांबाबत काय चालल आहे. हे समोर आले आहे. अगोदरच शरद पवार व अमित शहा यांच्या गुप्त भेटीबाबत अनेक तर्क वितर्क प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे राज्यातील आघाडी सरकारमधील व राष्ट्र्वादीतील मंत्री पवार बरे व्हावेत, अशी देवाकडे प्रार्थना करीत आहेत. तसेच आघाडीत बिघाडी व्हायला नको, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपनेते गुगली टाकत येणाऱ्या काळात नक्की सत्तांतर होणार, असे सांगत आहेत.

You might also like