हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स्ड डिपॉझिट्स हे अनेक वर्षांपासून लोकांच्या गुंतवणुकीचे मुख्य साधन बनले आहे. फिक्स्ड डिपॉझिट्स मुळे आपले पैसे सुरक्षित तर राहतातच मात्र त्याच सोबत आपल्याला गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतो. सध्या अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याज दरात बदल केले आहेत. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील अनेक बँका आपल्या FD वर जास्त दर देत आहेत.
जर तुम्हालाही FD करायची असेल तर त्याविषयी योग्य माहिती आपल्या कडे असणे आवश्यक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणती बँक आपल्या FD वर किती व्याज देत आहे.
बँक ऑफ बडोदा (BoB) ने आपल्या FD वरील व्याज दरात बदल केले आहेत, बँक आता 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीच्या 2 कोटींपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 2.8% ते 5.55% व्याज देत आहे.
खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असलेली ICICI Bank आता 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या 2 कोटींपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 2.5% ते 5.6% व्याज देत आहे.
कोटक महिंद्रा बँकेने देखील आपल्या 2 कोटींपर्यंतच्या FD वरील व्याजात वाढ केली आहे. बँक आता 2.5% ते 5.6% व्याज दर देत आहे. हे दर 12 एप्रिल, 2022 पासून लागू झाले आहेत.
खाजगी क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक असलेली HDFC Bank 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर 2.5% ते 5.6% व्याज देत आहे. हे दर 6 एप्रिल, 2022 पासून लागू झाले आहेत.
देशातील सर्वात मोठी बँक असलेली SBI 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.9% ते 5.5% व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंट जास्त ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD वर 3.4% ते 6.3% व्याज दर मिळत आहेत.