हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगाला दिलासा देणारी बातमी समोर आलीय. फायझर बायोटेकच्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी देण्यात आलीय. WHO कडून फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीच्या आयात व वितरणाचा मार्ग मोकळा झालाय. WHO च्या या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात व निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय. ब्रिटननं 8 डिसेंबरला या लसीच्या वापरासाधी सर्वात आधी परवानगी दिली होती.
त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनिअन देशांनीही या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली.. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळालेली फायझर बायोटेक ही पहिलीच प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीये.
कोरोना लसीच्या मंजुरीबाबत आज एक्सपर्ट कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आत्पकालिन वापरासाठी दोन्ही लसींना मान्यता मिळू शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’