जिनेव्हा । सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा प्रभाव काही देशात दिसत आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे 12 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा. दुकानं, ऑफिस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एअर एक्झॉस्टची व्यवस्था खराब असल्यामुळे फेस मास्कचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे.
गाईडलाइन्सनुसार, अशी ठिकाणं जिथे एअर एक्झॉस्टची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी घरांमध्येही पाहुणे आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा. तसेच एअर एक्झॉस्टची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी गर्दी असेल तर फेस मास्क वापरावा. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितंल की, फेस मास्क व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सुरक्षित आहे.
तसेच त्याचसोबत इतर सुरक्षात्मक उपाय जसं हात स्वच्छ ठेवण्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. गाइडलाइन्समध्ये सांगितल्यानुसार हेल्थ केअर वर्कर्स, जे कोरोना रुग्णांची काळजी घेतात, त्यांनी N95 मास्कचा वापर करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे की, शारीरिक परिश्रमाची कामं करताना लोकांनी मास्क वापरू नये. त्यामुळे अस्थमा किंवा श्वासाशी निगडीत आजार होण्याचा धोका संभवतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’