भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे?? शरद पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील एकूण राजकीय परिस्थितीवर याभेटीत चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितलं.

शरद पवार म्हणाले, ” सध्याच्या काळात एकत्रित नेतृत्व करण्याची गरज आहे. मजबूत 2024 च्या निवडणुकीकरता सत्ताधारी पक्षाविरोधात एक मजबूत नेतृत्व उभारण्याची गरज आहे. याच हेतूस्तव ममता बॅनर्जी यांनी हा दौरा केला. या बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली. देशात भाजपला पर्याय उभं करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतोय. जे कुणी बरोबर येतील, ज्यांची मेहनतीची तयारी असेल ते सगळे बरोबर असतील असं शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी भाजपला पर्याय उभी करणारी तिसरी आघाडी नेमकी कोणाच्या नेतृत्वात उभी राहणार? शरद पवार या आघाडीचं नेतृत्व करणार का? असे सवाल पत्रकारांनी ममता बॅनर्जी यांनी विचारले. त्यावर शरद पवार यांनी भूमिका मांडली. “आम्ही कोणाच्या नेतृत्वात काम करणार ही दुसरी गोष्ट आहे. पण आधी एकत्र येणं आवश्यक आहे. पर्याय उभा करायचा आहे ज्याच्यावर देशाचा विश्वास असेल. इथे लीडरचा विषयच नाही”, असं शरद पवार म्हणाले.

You might also like