नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत लोकसभेच्या सभापती पदासाठी महत्वाची टिप्पणी दिली होती. लोकसभेचा सभापती हा फक्त अधिक वेळा निवडून येण्याच्या निकषावर ननिवडला जाता. कार्यशील आणि हुशार व्यक्तिमत्वाला त्या पदावर काम करण्याची संधी दिली जावी. याच सूत्राच्या आधारावर भाजपचे कोटा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला यांना लोकसभेचे सभापती होण्याची संधी दिली आहे.
राजकरणात एका नंतर एक धक्के देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मोदी शहा यांच्या जोडीने लोकसभा सभापती पदी ओम बिर्ला यांची निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ओम बिर्ला हे फक्त दुसऱ्यांदा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांची लोकसभा सभापती पदी वर्णी लावण्याचे महत्वाचे कारण हे कि राजस्थानमध्ये ढोरपूरच्या राणी वसुंधरा राजे यांना शह देण्यासाठी मोठे नेतृत्व उभाकरण्याचा देखील भाजपने या निमित्त प्रयत्न केला आहे.
२००३ , २००८, २०१३ अशा तीन राजस्थान विधानसभा निवडणुकीत ते कोट्यातूनच आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकीत ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपचे निष्ठावान नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याच प्रमाणे लोकसभा सभापती पदाचा जुना संकेत मोडून नवा पायंडा पाडण्यासाठी मोदी शहा जोडीने ओम बिर्ला यांची या पदी निवड केली आहे.