सोलापूर : हॅलो महाराष्ट्र्र – ग्लोबल टिचर म्हणून ओळख असलेले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी अखेर ती माझ्या जीवनात माझ्या घरी आलीच, ओळखा पाहू? असे मजेशीर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला. पण हे ट्विट वाचताना सगळेच गोंधळात पडले. सर्वांनाच हा प्रश्न पडला कि डिसले सरांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ कोण? त्यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय ? शेवटी त्या गोष्टीचा उलघडा झाला आणि सर्वानी त्याचे कौतुक केले. डिसले सरांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ म्हणजे ‘ग्लोबल टीचर’ पुरस्काराची मानाची ट्रॉफी आहे. यानंतर डिसले यांचे ट्रॉफी सोबतचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. खूप प्रतीक्षेनंतर मिळालेल्या ट्रॉफीचा आनंद रणजितसिंह डिसले यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींना निवडण्यात आले होते. डिसले गुरुजी हे सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत शिक्षक आहेत. डिसले गुरुजी हे विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. तसेच ते बाकीच्या शिक्षकांनादेखील टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरित करत आहेत.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कौतुक करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले. त्यांना या पुरस्कारातून तब्ब्ल ७ कोटी रुपये मिळाले. आणि विशेष म्हणजे त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे त्यांनी जाहीर केले.