हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोना व्हायरस जगभर पसरला. करोनाने बलाढ्य म्हणून टिमगी मिरवणाऱ्या देशांना गुडघे टेकायला लावले. संपूर्ण जग कोरोनाशी लढाई लढत आहे. ते म्हणजे केसाच्या ९०० वा भाग इतका आकार असलेल्या एका विषाणूंसोबत. या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एक सैन्य जगभर दिवस रात्र काम करत आहे. हे सैन्य म्हणजे असंख्य डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी. ही सर्व माणसं स्वतःचा जीव धोक्यात घालून अदृश्य अशा महाभयंकर रोगाशी लढत आहेत. अशा या परिस्थितीत कोरोनासोबतची लढाई तोच देश जिंकू शकतो ज्याच्याकडं हे आरोग्य कर्मचाऱ्यांच सैन्य मुबलक प्रमाणात आहे. दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत WHO, ICN यांनी एक अहवाल समोर आणला आहे.
या अहवालात कोणत्या देशात किती आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या आहे याची माहिती दिली आहे. यात भारताचा सुद्धा समावेश आहे. तेव्हा १३० कोटींची विशालयकाय लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाशी मुकाबला करताना पुरेसं आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ आहे याबाबत एक आकडेवारी समोर आली आहे. WHO, ICNच्या अहवालात भारतातील २०१८ पर्यंतच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येची नोंद दिली आहे.
त्यानुसार, १३० कोटींच्या देशात नर्सेसची संख्या १५.६ लाख इतकीच आहे. तर ७ लाख ७२ हजार नर्सिंग सहयोगी कर्मचारी आहेत. एखाद रुग्णालय चालवण्यासाठी लागणारा मेडिकल स्टाफ भारतात ४७ टक्के आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्वात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टरांचं प्रमाण भारतात २३.३ टक्के आहे. तर अवघे ५.५ टक्के डेन्टिस्ट भारतात आहेत. या आकडेवारीनंतर भारत कोरोनासोबत लढाईसाठी किती सज्ज आहे याची कल्पना तर येतेच मात्र, सध्या भारतातील आरोग्य कर्मचारी कुठल्या तणावात काम करत आहेत याच भान सुद्धा आणून देणारी ही आकडेवारी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”