नवी दिल्ली । कोरोना संदर्भात सोशल मीडियावरून अनेकदा चुकीची माहिती परविल्या जाते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संदर्भात समाजात कोणताही चुकीचा संदेश जावू नये यासाठी आता WHO ने पूढाकार घेतला आहे. कोरोनासंदर्भातली खोटी माहिती रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नवीन चॅटबॉट इंटरेक्टिव्ह सर्व्हिस सादर केली आहे. ज्याद्वारे लोकांना योग्य व अचूक माहिती मिळेल.
या सेवेला स्प्रिंक्लर (Sprinklr) सोबत सादर करण्यात आले आहे. या सेवेला डब्ल्यूएचओच्या अधिकृत फेसबुक पेजद्वारे देखील वापरता येईल. यासाठी तुम्हाला डब्ल्यूएचओच्या अधिकृत फेसबुक पेजवर जावे लागेल. येथे देण्यात आलेल्या सेंड मेसेज पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोव्हिड-19 संदर्भात अचूक माहिती मिळेल. डब्ल्यूएचओने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर या संदर्भात माहिती दिली आहे. ते लिहीतात, डब्ल्यूएचओची हेल्थ अलर्ट सर्व्हिस लाईव्ह करण्यात आली आहे. आता युजर्स मेसेंजरवर या व्हायरस संदर्भात अचूक माहिती घेऊ शकतील.
डब्ल्यूएचओने एक लिंक देखील दिली आहे. ज्यावर क्लिक केल्यानंतर थेट डब्ल्यूओच्या मेसेंजरवर जाता येते. यानंतर गेट स्टार्टेड पर्यायावर क्लिक केल्यानंतर युजर्सला सर्व माहिती मिळेल. याव्यतिरिक्त डब्ल्यूएचओच्या पेजवर व्हायरसला तुमच्यापासून लांब ठेवण्यासाठी काही टिप्स देखील देण्यात आलेल्या आहेत.
https://www.facebook.com/WHO/photos/a.750907108288008/3065399520172077/
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा