हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत ४० पेक्षा जास्त आमदारांसह बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यानंतर आमच्याकडे ५५ मधील ४० आमदार असून आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची?? ठाकरेंची की शिंदेंची ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना केला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत स्पष्टीकरण देताना स्वतःचा अनुभव सांगितला. जेव्हा १९८० मध्ये माझ्याकडील ६७ आमदारांपैकी फक्त ५ जण माझ्या सोबत राहिले आणि बाकी सगळे गेले तरीही पक्ष हा माझाच राहिला. पक्ष संघटना ही गोष्ट वेगळी आहे आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे. पक्ष हा तिकीट देतो, पक्ष निर्णय घेतो, पक्ष तुम्हाला लोकांच्याकडे नेतो आणि लोकांच्या समक्ष पाठिंबा आणि निवडून द्यायला हातभार लावतो हा पक्ष असतो. निवडून आलेले लोक फक्त ५ वर्षांसाठी असतात तर पक्ष कायमस्वरूपी असतो असं शरद पवारांनी म्हंटल.
तसेच शिवसेना कधीही संपणार नाही असेही पवार म्हणाले. यापूर्वी छगन भुजबळांनी बंड केलं.आणि ते आमच्या पक्षात आले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत एक सोडून भुजबळासह सर्वजण पराभूत झाले. नंतर राणेंनी बंड केले तेही पराभूत झाले. आत्तापर्यंत शिवसेनेत ज्यांनी बंड केलं त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असे शरद पवारांनी स्पष्ट केले