पतीच्या आत्महत्येनंतर रेखा कोणाच्या नावाचं लावतात सिंदूर?; स्वतःच सांगितलं नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील दिलकश अदा, टाइमलेस ब्यूटीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि एव्हरग्रीन सौंदर्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री रेखा. त्यांच्या सौंदर्यापूढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फेल आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्या प्रचंड सुंदर दिसतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील रेखा तुफान चर्चेत असतात. रेखा यांनी पुढे उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले. पण त्यांचे लग्न देखील फार काळ टिकले नाही. पतीच्या निधनानंतर रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्याचे उत्तर रेखा यांनी दिले आहे.

https://www.instagram.com/p/CdXIjgGv6cf/?utm_source=ig_web_copy_link

रेखा यांनी एका कार्यक्रमात स्वतःच सिंदूर लावण्यामागचे कारण सांगितले. “मी कोणाच्याही नावाचं सिंदूर लावत नाही. मी माझ्या फॅशनसाठी सिंदूर लावते. माझ्या मेकअपवर सिंदूर लावल्यामुळे माझं सौंदर्य आणखी फुलून दिसतं. म्हणून मी सिंदूर लावते….’ असा खुलासा रेखा यांनी यावेळी केला.

https://www.instagram.com/reel/CatyNQ9D6xo/?utm_source=ig_web_copy_link

रेखा यांच्या तारुण्यातील आयुष्यात अनेक सेलिब्रिटी आले पण कोणासोबत त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. त्यानंतर रेखा यांनी १९९० मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले. पण मुकेश आणि रेखा यांचे नाते फक्त तीन महिने टिकले. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुकेश आणि रेखा यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुकेश यांनी गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. आता रेखा सर्वकाही असूनही एकट्या आयुष्य जगत आहेत.

https://www.instagram.com/p/CbFhNFnPZoH/?hl=en

रेखा जेव्हा अभिनेत्री नितू कपूर आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या लग्नात हजेरी लावली होती, तेव्हा देखील त्यांनी सिंदूर लावले होते. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली. पण रेखा यांनी फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि स्वतःला चांगलं वाटलं ते केले.