मुंबई । ”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात भरती झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकाही मंत्र्याने शासकीय रुग्णालयात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?” असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला विचारलाय.. (BJP MLA Atul Bhatkhalkar questions to state government on government hospital)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली. मात्र, शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी तशी माहिती दिली. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं मी स्वत:ला कॉरंटाईन करुन घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या’, असं आवाहन फडणवीस यांनी केलं होतं. सध्या फडणवीस यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटल भरती झाले. यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे.
मग कोरोनाची लागण झालेल्या १६ पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही ?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 26, 2020
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयात दाखल करा’, असं आपले सहकारी गिरीश महाजन यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालय सेंट जॉर्जमध्ये उपचार घेत आहेत. सरकारी यंत्रणेवरील विश्वास दाखवण्यासाठी फडणवीस सेंट जॉर्जमध्ये दाखल झाल्याचं गिरीश महाजन म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर पुन्हा एकदा डिसलाईक्सचा पाऊस, कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी घेतलं फैलावर
वाचा सविस्तर -👉 https://t.co/KLmaaAaG3S@narendramodi @PMOIndia #HelloMaharashtra #mankibaat— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
१ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे 'हे' नियम बदलणार
वाचा सविस्तर -👉 https://t.co/Voao0PcvGk#finiancialnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in