औरंगाबाद | मुलाला पोलिसांनी अडविल्याची माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटनस्थळी दाखल होत माझ्या मुलाला का मारले, पोलिसांना मारायचा अधिकार आहे का? मुलाने नियम मोडले असेल तर त्यावर कारवाई करा. पण मारता कशाला असे म्हणत पोलीसांशी हुज्जत घातल्याची घटना आज सकाळी वरद गणेश मंदिर समोर घडली.
या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीनी दिलेली अधिक माहिती अशी की, वरद गणेश मंदिर समोर पोलिस बॅरिकेट्स लावून वाहनांची तपासणी करीत होते. तेथे हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा चारचाकी मधून आला व बॅरिकेट्सजवळ येताच समोरील एका वाहन धारकला त्याच्या गाडीचा धक्का लागला. काही अंतरावर पुढे पोलिसांनी त्यास थांबविले. दरम्यान काय घडले हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्याच वेळी मुलाने वडिलांना फोन करून माहिती दिली.
मुलांचा फोन झाल्यानंतर काही वेळातच मिनिटातच हर्षवर्धन जाधव हे घटनस्थळी दाखल झाले व त्यांनी माहिती घेत माझ्या मुलाने नियम मोडले असेल तर कारवाई करा. मात्र पोलिसांनी माझ्या मुलाला का मारले? पोलिसांना मारहाण करण्याचा अधिकार आहे का? असे म्हणत वरद गणेश मंदिरासमोर पोलिसांशी हुज्जत घातली. बंदोबस्तावरील पोलीस जाधव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हेत. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी उपस्थित पत्रकार यांना दिली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou