पवार साहेब तुमची तब्बेत बरी आहे ना.. काळजी घ्या … उदयनराजेनी शरद पवारांची घेतली भेट

सिल्व्हर ओकवर राजे भावुक : म्हणाले... काळजी घ्या साहेब, तब्बेत सांभाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकारणात कोणीही असो. मात्र एखादा व्यक्ती आजारी असला तर आपला तो विरोधक का असेना त्याची काळजी वाटतेच. जर तो आपला राजकारणातला गुरु असेल तर काही बोलायलाच नको. याची प्रचिती मंगळवारी सर्वांना आली. राष्ट्रवादीचे खासदार सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांच्या तब्बेतीची सर्वांकडून विचारपूस होत असतना राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन मंगळवारी भेट घेतली. तसेच यावेळी पवार साहेबांच्या समोर जातात पवार साहेब तुम्ही ठीक आहात ना. तुमच्या तबेटीची काळजी घ्या, असे उदयनराजे म्हणाले. उदयनराजे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या परंतु उदयनराजे यांनी आपली ही भेट राजकीय नसून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असल्याचं स्पष्ट केलं

उदयनराजे भोसले यांनी काहीवेळ शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर उदयनराजे सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. मी साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार सिल्व्हर ओकवर आराम करत आहेत.

उदयनराजे भोसले यांना पवारांच्या तबेट्टीविषयी विचारणा केली असता त्यांनी पवार साहेब ठीक आहेत. मी साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. यावेळी उदयनराजे भोसले यांना अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, त्यावर बोलण्यास उदयनराजे भोसले यांनी नकार दिला.

You might also like