हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात दररोज कोणता ना कोणता नवीन स्मार्टफोन लाँच होतच असतो. ज्यामध्ये जबरदस्त फीचर्स मिळतात. आता या स्मार्टफोन बरोबरच मिळणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा चार्जर. कारण याशिवाय फोन वापरता येणे अशक्यच. आपल्याला बाजारात अनेक वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे किंवा क्षमतेचे मोबाईल चार्जर मिळतात. जर आपल्याला जरा हटके स्टाइलचा चार्जर हवा असेल तर तोही सध्या बाजारात उपलब्ध आहे. मात्र, कधी आपल्या हे लक्षात आले आहे का कि, बाजारामध्ये फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचेच चार्जर उपलब्ध आहेत. मात्र हे असे का ??? मोबाईलमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन मिळत असताना कंपन्यांना वेगवेगळ्या रंगांचे चार्जर द्यायला काय अडचण आहे???
हे जाणून घ्या कि, मोबाइल कंपन्या इतर रंगांचे Charger बनवत नाहीत यामागील कारण त्यांचा टिकाऊपणा आणि किंमत आहे. काळा आणि पांढऱ्या रंगांमुळे चार्जरचे आयुष्य वाढते. यामागील आणखी एक कारण असे कि, पांढरा आणि काळ्या रंगाचा चार्जर बनवताना कंपन्यांना कमी खर्च येतो.
काळ्या रंगाचा फायदा
याआधी स्मार्टफोनचे चार्जर फक्त काळ्या रंगामध्ये उपलब्ध असायचे. काळा रंग हा इतर रंगांपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतो. तसेच काळा रंग हा एक आदर्श उत्सर्जक (Emiter) देखील मानला जातो. त्याचे उत्सर्जन मूल्य 1 आहे. ज्यामुळे चार्जिंग दरम्यान निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून चार्जरचे संरक्षण होते. तसेच चार्जरचा काळा रंग हा बाहेरील उष्णता चार्जरच्या आतमध्ये जाण्यापासून देखील रोखतो. त्याचप्रमाणे यामागील दुसरे कारण असे की, काळ्या रंगांचे मटेरियल हे इतर रंगांपेक्षा स्वस्त असतात. त्यामुळे Charger बनवण्याचा खर्चही कमी होतो.
पांढऱ्या रंगाचा फायदा
आजकाल कंपन्या मोबाईलसोबत पांढऱ्या रंगाचा Charger देत आहेत. यामागे देखील तीन कारणे आहेत. यातील पहिले कारण असे कि, पांढरा रंग हा बाहेरील उष्णता चार्जरच्या आतमध्ये येऊ देत नाही. प्रत्येकाला माहित आहे की पांढरा रंग जास्त उष्णता ऊर्जा प्रतिबिंबित करतो आणि कमी उष्णता ऊर्जा शोषतो. ज्यामुळे चार्जर कमी तापतो आणि जास्त काळ टिकतो.
मात्र काळ्या रंगाच्या Charger मध्ये एक अशीही अडचण येते की रात्रीच्या अंधारात तो शोधायला अवघड जाते. तसेच पांढऱ्या रंगाचा चार्जर हा अंधारातही अगदी सहजपणे दिसून येतो. पांढरा रंग सौम्यतेचा देखील प्रतीक आहे. त्यामुळेच आता कंपन्यांनी पांढर्या रंगाचे चार्जर बनवायला सुरुवात केली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-accessories/mobile-chargers/pr?sid=tyy%2C4mr%2Ctp2
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Set Top Box शिवाय टीव्हीवर पाहता येणार 200 चॅनल, आता पुन्हा अँटेनाचे युग !!!
Flipkart च्या ‘या’ सेलमधून स्वस्तात खरेदी करा महागडे फोन, हातातील संधी गमावू नका
Saving Account : बँकेच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक राखणे बंधनकारक, जाणून घ्या या संबंधीचे नियम
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ