Set Top Box शिवाय टीव्हीवर पाहता येणार 200 चॅनल, आता पुन्हा अँटेनाचे युग !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात येत्या काही दिवसांत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी Set Top Box खरेदी करण्याच्या त्रासातून सुटका होऊ शकेल. कारण आता सेट टॉप बॉक्सशिवाय टेलिव्हिजनमध्ये इन बिल्ट सॅटेलाइट ट्यूनर्सच्या मदतीने 200 हून जास्त चॅनेल देण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. नुकतेच याबाबतची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

सामान्य प्रेक्षकांना ही सुविधा सुरू झाल्यानंतर 200 हून जास्त चॅनेल Set Top Box किंवा फ्री डिशशिवाय पाहता येतील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर याबाबत म्हणाले की,” फ्री डिशवर सामान्य मनोरंजन चॅनेलचा मोठा विस्तार झाला आहे, ज्यामुळे करोडो दर्शक आकर्षित करण्यात मदत झाली आहे.”

Rekomendasi Set Top Box TV Digital Terbaik 2022 - Berdikarinews.id

अजून निर्णय होणे बाकी

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, “मी माझ्या विभागात एक नवीन सुरुवात केली आहे. आपल्या टेलिव्हिजनमध्ये इन बिल्ट सॅटेलाइट ट्यूनर असेल तर यासाठी वेगळा सेट-टॉप बॉक्स घेण्याची गरज भासणार नाही. आता लोकांना रिमोटच्या एका क्लिकवर 200 हून जास्त चॅनेलवर एक्सेस मिळू शकेल,” मात्र या प्रकरणात अद्याप निर्णय होणे बाकी असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Rekomendasi Set Top Box TV Digital Harga Rp100.000-an - Solopos.com |  Panduan Informasi dan Inspirasi

छतावर लावण्यासाठी अँटेना

अनुराग ठाकूर यांनी गेल्या डिसेंबरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना टेलिव्हिजन उत्पादकांना सॅटेलाईट ट्यूनरसाठी इंडस्ट्रियल स्टॅण्डर्ड ब्युरोने जारी केलेल्या मानकांचा वापर करण्याच्या सूचना जारी करण्यासाठी पत्र लिहिले. बिल्ट-इन सॅटेलाईट ट्यूनर्ससह दूरदर्शन सेट इमारतीच्या छतावर किंवा बाजूच्या भिंतीसारख्या योग्य ठिकाणी एक लहान अँटेना बसवून फ्री-टू-एअर टेलिव्हिजन आणि रेडिओ चॅनेलचे प्रसारण सक्षम करतील. हे जाणून घ्या कि, सध्या टेलिव्हिजन दर्शकांना विविध सशुल्क आणि फ्री चॅनेल पाहण्यासाठी Set Top Box विकत घ्यावा लागतो.

Everything you Need to Know About your IPTV Set-Top Box | RFEQ

हे जाणून घ्या की, दूरदर्शन फ्री डिश असलेल्या कुटुंबांची संख्या गेल्या 6 वर्षांत वाढून दुप्पट झाली आहे. KPMG च्या रिपोर्ट्स नुसार, 2015 मध्ये, दूरदर्शन फ्री डिश ग्राहकांची संख्या 2 कोटी नोंदवण्यात आली होती. यानंतर 2021 मध्ये ती वाढून 4.3 कोटी झाली. Set Top Box

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://mib.gov.in/#:~:text=31%2F08%2F2021-,Honble%20Union%20Minister%20Prakash%20Javdekar%20to%20launch%20an%20e%2Dcompendium,%2C%20Fundamental%20Rights%2C%20and%20Duties.

हे पण वाचा :
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ
EPFO: दुसरी नोकरी मिळेपर्यंत PF काढण्यावर टॅक्स द्यावा लागणार लागेल का ???
Infinix Hot 20 5G फोनवर मिळावा जबरदस्त डिस्काउंट, स्टॉक संपण्यापूर्वी करा खरेदी