हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री देशमुख यांच्या घरी काल ईडीने छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही असा सवाल उपस्थित करत परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती असे देखील देशमुख म्हणाले.
देशमुख म्हणाले, ईडीचे काही अधिकारी चौकशीसाठी आले होते. त्यांना मी पूर्ण सहकार्य केलं आहे. पुढील काळातही सहकार्य करणार आहे. परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले होते. त्यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यांची जी संशयास्पद भूमिका होती त्यामुळे आम्ही त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवलं होतं. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी आयुक्त असतानाच आरोप करायला हवे होते’ अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, ईडीकडून काल अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. त्याच चौकशी अंतर्गत अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय साहाय्यकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.