आम्ही पण बघून घेऊ; अनिल देशमुख प्रकरणी राऊतांचा विरोधकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देत आम्ही पण बघून घेऊ असे म्हंटल आहे.ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

तसेच देशात जर भाजप विरोधात महाआघाडी करायची असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही असेही राऊतांनी म्हंटल. काँग्रेसशिवाय देशात कोणतीही आघाडी होऊ शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही तीच भूमिका आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.