शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? : छगन भुजबळ यांचा सडेतोड सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शाळांमध्ये सावित्रीबाई फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावावेत. परंतु आपण सरस्वती देवीचा फोटो लावतो, कोणी देवी सरस्वतीला पाहिले आहे का? सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही, मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची? असा सडेतोड सवालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते. तेव्हा त्यांनी देवी सरस्वतीवरून सडेतोड व वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही, देवी सरस्वतीला कोणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असंही भुजबळ म्हणाले.

शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा. परंतु तुमच्या घरात ज्यांनी तुम्हांला शिक्षण उपलब्ध करून दिले त्यांचे फोटो नसतील.