WI vs PAK : पाकिस्तानी खेळाडूचा मैदानातच राडा, रन आऊट झाल्यावर कर्णधार बाबर आझमवर भडकला

WI vs PAK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुलतान : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या मैदानात बरेच वेळा खेळाडूंचा संयम सुटतो आणि ते नको ते करून बसतात. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (WI vs PAK) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यातदेखील असेच काहीसे झाले. इमाम उल हक आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी चांगली पार्टनरशीप करत पाकिस्तानचा स्कोअर 145 रनपर्यंत पोहोचवला, पण यानंतर इमाम बाबरवर भडकला.

काय घडले सामन्यात ?
इमाम 28व्या ओव्हरमध्ये 93 बॉलमध्ये 77 रनवर खेळत होता, तर बाबरने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं. ओव्हरचा पाचवा बॉल इमामने कव्हरच्या बाजूने मारला आणि एक रन धावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या फिल्डरने बॉल अडवला, पण तोपर्यंत इमाम नॉन स्ट्रायकरच्या दिशेने धावायला लागला होता. बाबर आझम मात्र रनसाठी धावला नाही आणि त्याने इमामला परत पाठवले. या सगळ्या गोंधळात वेस्ट इंडिजचा विकेट कीपर शाय होपने इमामला रन आऊट केलं.

रन आऊट झाल्यानंतर इमाम मैदानातच भडकला आणि त्याने बॅट जमिनीवर जोरात आपटली. तसेच पॅव्हेलियनमध्ये जात असतानाही इमाम चांगलाच नाराज झाला होता. इमाम आऊट झाल्यानंतर काही वेळाने बाबरही 77 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात (WI vs PAK) पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 275 रन केले. याचा लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 155 वर संपुष्टात आला. यामध्ये (WI vs PAK) वेस्ट इंडिजकडून अकील हुसैनने 10 ओव्हरमध्ये 52 रन देऊन 3 विकेट मिळवल्या, तर अल्झारी जोसेफ आणि एंडरसन फिलिपला 2-2 विकेट घेण्यात यश आले. पाकिस्तानकडून मोहम्मद नावाजने 4 विकेट घेत सामनावीराचा मान पटकावला आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेच्या संजयचा पराभव

भारताला मोठा धक्का ! Mary Kom ची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

Car Safety Features : नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या

उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड

‘या’ तीन प्रकारच्या झाडांच्या पानांची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!