पुणे हादरलं ! अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चाकण : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील चाकण परिसरात पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची धारधार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. अश्विनी सचिन काळेत असे या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ती तेवीस वर्षाची होती. मागच्या काही दिवसांपासून या दोघां पतिपत्नींमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडणे होत होती. कालसुद्धा या दोघांमध्ये वाद झाला.

त्यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला कि आरोपी पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केली. आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती सचिन काळते हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मागच्या काही दिवसांपासून मृत अश्विनी आणि आरोपी पती सचिन काळते यांच्यामध्ये वाद होता. या वादातून आरोपी पती आपल्या पत्नीला सतत मारहाण करत होता. घटनेच्या दिवशी हा वाद विकोपाला गेल्याने पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली.

हि हत्या केल्यानंतर आरोपी पती सचिन काळते हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याने आपल्या पत्नीला नेमक्या कोणत्या कारणामुळे मारले याचा तपास पोलीस करत आहेत. चाकण पोलिसात फरार असलेला सचिन काळते याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. तसेच या हत्येची आणखी कोणती आजू आहे का याचा तपाससुद्धा पोलीस करत आहेत.