धक्कादायक ! गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने गच्चीवर झोपलेल्या पतीची आपल्या प्रियकराच्या मदतीनं हत्या केली आहे. आपल्या पतीला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या देऊन त्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना उत्तर प्रदेशमधील बमनयी गावामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशमधील बमनयी गावात राहणाऱा 34 वर्षांचा खेमकरण हा रोज जेवण झाल्यानंतर रात्री घराच्या गच्चीवर झोपत असे. त्याच्या पत्नी चांदनी हिचे कृष्णा नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकऱण सुरू होतं. विशेष म्हणजे खेमकरण हा कृष्णाचा मामेभाऊ होता. आपली पत्नी आणि कृष्णामधील जवळीक खेमकरणच्या लक्षात आली होती. त्याने वारंवार यावर आक्षेप घेतला होता. चांदनीची कृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र खेमकरण याच्या आड येत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. यानंतर चांदनीने खेमकरणला रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे खेमकरणला गाढ झोप लागली. त्यानंतर कृष्णा फावडं घेऊन गच्चीवर गेला आणि त्याने खेमकरणाच्या गळ्यावर जोरदार वार करून त्याची हत्या केली. यादरम्यान गळ्यावर वार झाल्यानंतर खेमकरणने जोरात किंकाळी फोडली. त्यामुळे घाबरलेल्या कृष्णानं घराच्या मागच्या बाजूला फावडं फेकले आणि त्या ठिकाणाहून पसार झाला.

असा झाला या प्रकरणाचा उलगडा
मृताच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. खेमकरणचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. त्यावेळी एक अज्ञात चप्पल घरात असल्याचं पोलिसांना आढळून आली. ती चप्पल कुणाची, याचं उत्तर घरातील कुणालाच देता आलं नाही. त्यानंतर संशयावरून पोलिसांनी पत्नी चांदनीची कसून चौकशी केली असता, तिनं आपला गुन्हा मान्य केला आहे. खुनाच्या वेळी खेमकरणनं किंकाळी फोडल्यामुळं घाबरलेला कृष्णा चप्पल न घालताच पळून गेला. त्याच्या चपलेवरून पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा आणि चांदनीला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment