टाळेबंदीत नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा; पत्नी पीडित संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । टाळेबंदीत अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात आहे. त्यामुळे वैतागलेला पुरुष घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब त्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने समाजालादेखील घातक आहे. टाळेबंदीमुळे कौटुंबिक तणाव वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. टाळेबंदीमुळे घरी असलेल्या नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. टाळेबंदीमुळे महिनाभर जवळपास सर्वच पुरुष मंडळी घरी असताना पुरुषांच्या छळाचे प्रकार वाढल्याचे संघटनेने म्हटले आहे.

टाळेबंदीत अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात आहे. त्यामुळे वैतागलेला पुरुष घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब त्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने समाजालादेखील घातक आहे. त्यामुळे अशा महिलांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारी यांनी केली आहे.

महिलांचा छळ केल्यास कारवाईचा पोलीस प्रशासनाने दिला आहे इशारा –
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात टाळेबंदी करण्यात आळी आहे. कोणीही घराबाहेर पडू नये असे, सरकारने निर्देश दिले आहेत. मात्र, सर्वच लोक घरात असल्याने कौटुंबिक हिंसाचार वाढत असल्याचे काही प्रमाणात समोर आले आहे. महिलांचा छळ केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. मात्र पुरुषांचादेखील छळ होत असल्याचा आरोप पत्नी पीडित पुरुष संघटनेने केला आहे. ही राज्यातील एकमेव संघटना पुरुषांच्या हक्कासाठी लढते आहे.

टाळेबंदीत नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा

ही आहे पत्नी पीडित संघटनेची तक्रार-
पुरुष घरात असल्याने अनेक पद्धतीने महिलांकडून त्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. काही ठिकाणी महिला पुरुषांना मारहाण करत असल्याने पुरुषांचे मनोबल घटत आहे. त्यांची मानसिक स्थिती खराब होत असल्याने पुरुष मंडळी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. घराबाहेर टाळेबंदी असल्याने काय करावे, हे कळत नसल्याने पुरुषांचे मानसिक आरोग्य खराब होत आहे.

टाळेबंदीत नवर्‍यांना छळणार्‍या बायकांना क्वारंटाईन करा, पती पिडित संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Comment