सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर- केळघर रस्त्याच्या बांधकामात उपअभियंता निकम यांनी रेगडीच्या भूगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालानुसार कोणतीही उपाययोजना न करता रस्त्याचा प्रकार बदलत लाॅकडाऊमध्ये काम केल्याने अडचण निर्माण झाली आहे. भूस्खलनाचा धोका कायम राहत बोडारवाडी व भावळे गावे गाडली जाण्याची भीती भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात व्यक्त होत आहे.
केळघर घाटातील रेंगडी गावाजवळील भागाचा भूगर्भशास्त्रज्ञांनी २०१८ साली सर्व्हे केला होता. याच्या अहवालानुसार फक्त कागदोपत्री सुरक्षेकरिता महसूल विभागाने देखील भावळे, रेंगडी, बोडारवाडी गावांना धोका असल्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र ठेकेदार गडोख आणि त्यांच्या कंपनीकडून काळाकडा ते रेंगडी गावापर्यंतचा रस्त्या करताना भूस्खलनाचा धोका असतानाही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निकम यांनाही या अहवालाची माहिती असताना त्यांनी डोळे झाकूनच हे काम पुढे नेलं. महाबळेश्वर ते काळाकडा या रस्त्याच्या बांधकामात काही महत्त्वाच्या बाबींमध्ये त्रुटी राहिल्या आहेत, ज्या पुढे धोकादायक ठरु शकतात त्याकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनता, चालक आणि प्रवाशांकडून होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.