अमेरिकेच्या राजकारणातील ‘चाणक्य’ ठरलेले जो बायडेन नवी अमेरिका घडवणार का??

Joe Biden
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ७८ वर्षीय ‘जो बायडन’ यांनी नवीन इतिहास रचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा अवघं एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मत्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान हा निकाल समोर येताच जो बायडन यांनी पहिलं ट्विट करुन अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले तसेच अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवलं हा मी माझा बहुमान समजतो असंही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही मला मत दिलं असो की नसो मी सगळ्या अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगलं काम करणार या आशयाचं वाक्यही बायडन यांच्या ट्विटमध्ये आहे.

बायडन यांची ‘स्टार्ट टू इंड’ प्रवास

बायदन यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात वकिलीच्या पेशाने सुरू केली. काही काळानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये त्यांनी डेलावेयरच्या न्यु काऊंटी येथुन निवडणूक लढवली व ते विजयी सुद्धा झाले. त्यानंतर 1973 ते 2009 पर्यंत बायडन सीनेटर म्हणून लगातार निवडून आले. मात्र 2009 मध्ये त्यांना ओबामा यांच्या कार्यकाळात उप-राष्ट्रपती म्हणून पद मिळाल्याने बायडन यांना सीनेटर पद सोडावे लागले.

अमेरिकेच्या राजकारणात दिग्गज नेत्यांपैकी एक बायडन यांची ओळख आहे तसेच एक कुशल प्रवाक्ता म्हणून देखील त्यांना ओळखल्या जाते. त्यांचं नाव अजूनही बऱ्याचशा लोकांना माहिती नसून, त्यांचे संपुर्ण नाव ‘जोसेफ रॉबिनेट बायडन’ असे आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील पेंसिलवेनिया राज्यातील स्कॅटन येथे झाला.  जो बायडन हे 1972 पासून आतापर्यंत सहा वेळा सीनेटर म्हणून निवडून आले आहे. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती असतांना बायडन यांनी अमेरिकेचे 47 वे उप-राष्ट्रपती पद सांभाळले. अमेरिकेच्या इतिहासात बायडन हे 5 वे युवा सीनेटर होते. बायडन जर अमेरिकेचे राष्ट्रपती झाले, तर ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वृद्ध राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणार आहे. कारण त्यांचे वय 78 वर्ष इतके आहे.

डेलावेयरातून सहा वेळा सीनेटर राहिलेले बायडन राष्ट्राध्यक्ष निवडणूसाठी तिसऱ्यांदा रिंगणात उतरले होते. 1988 साली त्यांनी पहिली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्यावर साहित्यिक चोरीचा आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मागे हटावे लागले. त्यानंतर बायडन यांनी पुन्हा 2008 साली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. बायडन हे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या जवळचे असल्याने, ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन 2008 ते 2016 पर्यंत उप-राष्ट्रपती होते. यंदाच्या 2020 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत बायडन यांना विजयी करण्यामागे बराक ओबामा यांचे खुप मोठे योगदान आहे.

बायडन यांच्या समोर वाढून ठेवलेली आव्हान- 

बायडन यांच्या समोर पहिलं आव्हान असेल ते म्हणजे कोरोना व्हायरस हे आरोग्य संकट यशस्वीपणे हाताळणे.१ कोटी २० लाख अमेरिकन सध्या बेरोजगार झाले आहेत ट्रम्प यांनी चार वर्षांपूर्वी दिलेलं वचन बायडन पूर्ण करू शकतील का यावर सगळ्यांची नजर राहील.आर्थिक मंदीमुळे झालेला परिणाम आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे या गोष्टींवर प्रशासनाचे लक्ष असेल.

-अन्वय गायकवाड
८४८४०३४६०१
(लेखक औरंगाबाद येथे पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’