हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिंदे गट शिवसेना भवनावर दावा सांगणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी भूमिका स्पष्ट करत आम्ही शिवसेना भवनावर दावा सांगणार नाही असं म्हंटल आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाठ यांनी सांगितलं कि, शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. त्यामुळे त्यावर आम्ही दावा सांगणार नाही. मात्र जेव्हा कधी आम्ही शिवसेना भवना वरून जाऊ तेव्हा आम्ही त्यापुढे नसमस्तक होऊ. कारण शिवसेनाप्रमुखांबरोबर अनेक वेळा आमच्या बैठका पार पडल्या आहेत आणि त्यांनी वेळोवेळी शिवसेना भवनात आंम्हाला मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे, त्या मंदिराचा आम्हला ताबा घ्यायचा नाही असं शिरसाठ यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणजे गाडीखालचे कुत्रे आहेत, त्यांना वाटत गाडी मीच ओढतोय पण त्यांनी आम्हला शहाणपणा शिकवू नये अशी जहरी टीका संजय शिरसाठ यांनी केली. तसेच आता सर्व काही सुरळीत झाल्यामुळे लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडेल असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला.