व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आता…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निर्णय घेण्याचा आयोगाला अधिकार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिले आणि उद्धव ठाकरेंना आता पोट निवडणुकी पर्यंतच मशाल हे चिन्ह आणि नाव वापरण्याचा निर्णय दिला. आयोगाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आयोगाला निवडणूक घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र, त्यात पक्षांमधील वादाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? यावर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले, तर त्यांना न्याय मिळेल .

आयोगाने नेमके काय म्हंटले आहे?

ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरता येईल, असे आयोगानाने म्हंटले आहे.