हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे -फडणवीस सरकार लवकरच पडेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना विचारलं असता, मी काय जोतिषी नाही, पण कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत असं विधान त्यांनी केलं.
शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी सरकार बाबत केलेल्या दाव्यावर विचारलं असता पवार म्हणाले, रकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केलं.
https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/622525172417854/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C
दरम्यान, ओबीसी राजकीय आरक्षणा बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णया वरून हि त्यांनी भाष्य केलं. न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. त्यामुळे मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती या निर्णयामुळे निर्माण झाली आहे. अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली . तसेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्या वरून त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला . मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना आपण सरकार चालवू असा आत्मविश्वास आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असा टोला पवारांनी लगावला.