राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?? शरद पवार म्हणतात…

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकानी हल्ला केल्यानंतर राज्यातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून भाजप नेते सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

शरद पवार पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,  राष्ट्रपती राजवट लावण्याच्या चर्चा केल्या जातात, दमदाटी केली जाते पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुका लागल्या तर जनता काय निकाल देते हे कोल्हापूरकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणी राष्ट्रपती राजवटीच्या टोकाला जाईल असं वाटत नाही, अस म्हणत पवारांनी या चर्चेतील हवाच काढली.

दरम्यान, सध्या राज्यात जे काही वातावरण आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे . सरकार गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत, सत्ता गेल्यानं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही यामुळे त्यांना अस्वस्थता आहे अस म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.