हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. यांनतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे २ गट पडले. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट भविष्यात पु्न्हा एकत्रित येऊन जुळतील का? असा सवाल केला असता शिंदेनी स्पष्टच उत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांना भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत जाणारा का असा सवाल केला असता शिंदे म्हणाले, आता मागे जाण्यात काही अर्थ नाही. त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कधी दूर होईल, हे माहीत नाही. पण हे खरं आहे की भाजप आणि शिवसेनेला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. सध्या तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. आता भविष्यात त्यांना विचार करायचा आहे की त्यांनी काय केलं पाहिजे असं शिंदे म्हणाले.
आम्ही गद्दार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण ऐतिहासिक क्रांती घडवून आणली आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला कौल दिला होता, मात्र त्यानंतर आमच्या पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली, ती अनैतिक होती. तेथूनच उद्धव ठाकरेंशी आमचे मतभेद सुरू झाले. जेव्हा उद्धव ठाकरे हे मोदींना भेटले होते तेव्हाही पुन्हा युतीची चर्चा सुरू होती. परंतु पुढे काही होऊ शकलं नाही. त्यानंतर जे व्हायचं ते झालं असं शिंदे यांनी म्हंटल.