भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार? अंबादास दानवे म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जोरदार चर्चेत आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा १५० दिवसांच्या प्रवासात काश्मीर पर्यंत जाईल. सध्या हि यात्रा तेलंगणा राज्यात असून ७ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. याबाबत ठाकरे गायचे नेते अंबादास दानवे याना विचारलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मला वाटतं उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतील. काँग्रेसचे नेतृत्व देशभक्ती आणि भारत जोडण्याचा उद्देश ठेवून मोहीम राबवत असेल, तर या यात्रेत सहभागी होण्यात काहीही अडचण नाही मात्र याबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून यात्रेला सुरूवात होईल. महाराष्ट्रात तब्बल १६ दिवस ही यात्रा असणार आहे. यादरम्यान, ३८३ किलोमीटरची पदयात्रा पार पडेल. यावेळी काँग्रेसने बहुसंख्य नेते आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी सहभागी होतील.