लंडन : वृत्तसंस्था – लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बलडन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने (Aishwarya Jadhav) भारताचा तिरंगा अटकेपार फडकावला आहे. अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये निवड झालेली ऐश्वर्या (Aishwarya Jadhav) एकमेव भारतीय आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐश्वर्याचा (Aishwarya Jadhav) जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या ऍण्ड्रीया सोराने पराभव केला, पण ऐश्वर्याने तिला तगडी फाईट दिली होती. पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरी ऐश्वर्याच्या हातात आणखी दोन सामने आहेत. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये ऐश्वर्याने हे दोन्ही सामने जिंकले तर तिला पुढच्या राऊंडमध्ये जाता येऊ शकते.
दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस असोसिएशन म्हणजेच एआयटीएफने 14 वर्षांखालच्या मुलींची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अनेक जागतिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ऐश्वर्याने (Aishwarya Jadhav) चार मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारली होती, पण तिला फायनल खेळता आली नाही. तिच्या याच कामगिरीच्या जोरावर ऐश्वर्याची विम्बलडनसाठी निवड झाली आहे.
विम्बलडन स्पर्धा सुरू होण्याआधी ऐश्वर्याने (Aishwarya Jadhav) 4 ते 6 जुलैदरम्यान विशेष ट्रेनिंग कॅम्पमध्ये भाग घेतला होता. अखिल भारतीय टेनिस महासंघाची नंबर एक खेळाडू असलेली ऐश्वर्या विम्बलडननंतर बेल्जियम, पॅरिस आणि जर्मनीमध्येही युरोप ज्युनिअर टेनीस स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. 2021 च्या सुरूवातीला ऐश्वर्या भारतातल्या अंडर-14 मध्ये 94व्या क्रमांकावर होती, पण एका वर्षाच्या आतच तिने आपली कामगिरी सुधारून मोठी झेप घेत सातवा क्रमांक पटकावला आहे.
ऐश्वर्या जाधव हिच्याविषयी थोडी माहिती
वयाच्या पाचव्या वर्षी ऐश्वर्याने (Aishwarya Jadhav) हातात रॅकेट घेतले आणि खेळायला सुरुवात केली. यानंतर वयाच्या नवव्या वर्षी तिने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. या स्पर्धांमधून तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक विजय मिळवले. 2008 साली जन्मलेली ऐश्वर्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यातल्या युवलुज गावाची आहे, पण ऐश्वर्याच्या करियरच्या दृष्टीने तिच्या आई-वडिलांनी कोल्हापूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने आतापर्यंतच्या संपूर्ण यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला दिलं आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार