कपबशीला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा : बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमधील सहकार पॅनेल मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यासाठीचा जाहीर मेळावा समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथे आज संपन्न झाला. यावेळी कपबशी या चिन्हाला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, मदानराव मोहिते, सुभाषराव जोशी, भीमरावदादा पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील- उंडाळकर, प्रकाश पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, जगदीश जगताप, सुभाष पाटील, जयंत पाटील, सौरभ पाटील, प्रशांत यादव, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, प्रदीप विधाते, निवासराव पाटील, सत्यजीतसिंह पाटणकर, कांतीलाल पाटील, प्रणव ताटे, अशोकराव पाटील-पार्लेकर, रामभाऊ लेंभे, गोपाळराव धोकटे, सुरेश साळुंखे, निवासराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सुहास बोराटे, सुनील पाटील, ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे, सांगीता साळुंखे तसेच तालुकातील मतदार, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व.किसन वीर यांनी पायाभरणी केलेली बँक त्यांच्याच विचाराने चालू आहे . बँकेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही. शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायासाठी अल्प व्याजदराने अर्थ पुरवठा केला अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना 45 कोटी रुपयांचा अर्थ पुरवठा करून तरुणांना उच्च शिक्षणासाठी अर्थ पुरवठा केला तसेच नवंउद्योजक म्हणून उभे केल. कोरोना व अतिवृष्टीच्या काळात देखील सामाजिक बंधीलकीतून काम केले आहे. बँकेचे कामकाज उत्कृष्ट असल्यामुळेच बँक देशांमध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेत नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.

Leave a Comment