हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून सुरु होत असलेलं अधिवेशन 29 डिसेंबर पर्यंत म्हणजे 23 दिवस असणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाच्या मुद्यांसह महागाईवाढ हा मुद्दा जास्त गाजुन्याची शक्यता आहे. आहे.
आजपासून सुरु होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात 16 विधेयके सादर केली जाणार असून त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयकाचा समावेश आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार विविध मुद्यावरुन आज सभागृहात आवाज उठवू शकतात.
भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर हमीभावाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, खासदार जयराम रमेश आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.