‘वंदे मारतम्’ ने झाली विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाला सुरूवात

अधिवेशन
अधिवेशन
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सतिश शिंदे

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदे मातरम’ ने सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रिमंडळ आणि विधिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे आमदार एकनाथ खडसे, राज पुरोहित उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम्‌ने करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूलमंत्री तथा सभागृह नेते चंद्रकात पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.