सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्यावरून घमासन उडाले. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माफी मागण्याच्या मुद्यावरून विरोधकांच्यासोबत खडाजंगी झाली. तेव्हा भास्कर जाधव यांनी कराड दक्षिणचे स्वर्गीय माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या नावाचा उल्लेख केला.
सुधीरभाऊ गेल्या 27 ते 28 वर्षात तुमच्यावर अनेकदा माफी मागण्याची वेळ आली होती, असे भास्कर जाधव यांनी सांगताच. सुधीर मुनगंटीवार यांनी कधी- कधी असे म्हणताच, भास्कर जाधव मोठ्या आवाजात म्हणाले, विलासराव पाटील काका- उंडाळकर तिथे बसले होते. तेव्हा तुम्ही काय बोलला होता तुम्ही ते मला माहिती आहे. तेव्हा मी असंसदीय शब्द वापरलेला नाही.
मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज पहिला दिवस उर्जा मंत्री नितिन राऊत आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदीच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून गाजला. यावेळी विरोधकांकडूनही चुका झालेल्या आहेत, तेव्हा माफी मागायची वेळ कितीदा आली हे सांगण्यात आले. भास्कर जाधव यांनी सुधीर मुनगंटीवार याच्याबाबतीत असाच प्रसंग आला होता, यांची आठवण करून देताना सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून आमदारकीची सप्तपदी पूर्ण करणारे विलासराव पाटील काका- उंडाळकर उपस्थित होते, असा आवर्जून उल्लेख केला.