सहाय्यक वायरमनचा वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील खालकरवाडी गावचे हद्दीत माळ नावचे शिवारात महावितरणच्या इलेक्ट्रॉनिक लोखंडी पोल वर काम करणाऱ्या ६० वर्षीय सहाय्यक वायरमनचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.९ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
‌‌
विष्णू रामचंद्र खालकर (वय६०) रा. खालकरवाडी ता.कराड असे शॉक लागून जागीच मृत्यू झालेल्याचे नांव आहे. सदर घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून तपास पोलिस करीत आहेत.

याबाबत शंकर रामचंद्र खालकर रा.खालकरवाडी ता.कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खालकरवाडी गावचे हद्दीत माळ नावचे शिवारात महावितरणचे वायरमन अशोक चव्हाण यांच्या हाताखाली इलेक्ट्रॉनिक लोखंडी पोलवर काम असताना विष्णू खालकर यांना वीजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला असे दिलेल्या फिर्यादी नमूद करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.