नवी दिल्ली । देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. भारतात मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
कोरोना मृत्यूच्या संख्येत भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सीकोचा क्रमांक लागतो. कोरोना बळींच्या संख्येच्या यादीत १३ दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावर पोहचला होता. दररोज होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे भारत आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, भारतात ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत ब्रिटनमध्ये ४६ हजार ७०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी भारताने ब्रिटनला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारताचा मृत्यूदर फक्त २ आहे. तर ब्रिटनचा मृत्यूदर १४.९ टक्के आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत अमेरिका (१ लाख ६८ हजार २१९), ब्राझील (एक लाख ३ हजार ९९), मेक्सिको (५३ हजार ९२९) आणि चौथ्या स्थानी भारत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”