कानात हेडफोन घालून भिंतीवर बसणे तरुणाच्या जीवावर; झाड अंगावर पडून झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | मिरज मेडीकल कॉलेजच्या क्रीडांगण येथे कंपाऊंड भिंतींवर मोबाईल वर बोलत असताना असताना अंगावर झाडाची फांदी पडल्याने यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी बाजूला काढून यशाच्या मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

यश कदम हा कंपाऊंडच्या भींतीवर चढून बसला होता. त्याने कानात हेडफोन घातले होते. त्याच्या पाठीमागेच वडाचे झाड होते. जोरदार सोसाट्याचा वारा सुटला आणि हर्षवर्धन कदम जिथे बसला होता. कानामध्ये हेडफोन असल्यामुळे झाड जोरदार हलत हलत असताना आणि झाडाची फांदी मोडताना आवाज त्याला कळाला नाही. त्याचवेळी झाडाची फांदी हर्षवर्धन यांच्या छातीवर मोडून पडली. फांदी पडल्याचा आवाज ग्राउंडवर आला. लगेच ग्राउंडवर असणार्‍या नागरिकांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु झाडाची फांदी भली मोठी असल्यामुळे हर्षवर्धन कदम यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, कानात हेडफोन घातल्यामुळे झाडाची फांदी मोडताना त्याचा आवाज हर्षवर्धन कदम याला ऐकू आला नाही. मात्र, फांदीखाली अडकल्याने यश याचा जागीच मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी हटवून यश याचा मृतदेह बाहेर काढला.