हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्यात भाजप सोबत नसेल तर लोकसभेला शिवसेनेच्या ३-४ जागाही निवडून येतील की नाही माहित नाही असे म्हणत आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे तसेच इतर राज्यात शिवसेने पेक्षा माझ्या पक्षाची ताकद जास्त आहे असा चिमटाही त्यांनी काढला. ते नाशिक येथे बोलत होते.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे पानिपत होणार आहे. शिवसेनेची अवस्थासुद्धा काँग्रेससारखी दयनीय होणार आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या सोबत शिवसेना राहिली नाही, तर लोकसभेच्या तीन-चार जागा निवडून येतील की नाही अशी शंका आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला.
दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य आहे. मात्र, काँग्रेसमध्ये एकही सक्रिय नेता नाही त्यामुळे आता काँग्रेसला भवितव्य नाही अशी टीकाही त्यांनी केली