PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही त्यापैकीच एक आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या अतंर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. मात्र यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

PM Kisan योजनेच्या रजिस्ट्रेशन साठी अनेक कागदपत्रे लागतात. आता या कागदपत्रांच्या लिस्टमध्ये रेशन कार्ड सामील केले गेले आहे.
या योजनेच्या नवीन नियमांनुसार आता या योजनेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी बँकेचे पासबुक, आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे तसेच रेशनकार्ड नंबर द्यावा लागणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Installment: 5 Reasons Why There Can Be A  Delay In Receiving Money

PM Kisan  योजनेत फसवणूक झाल्याच्या तक्रारींनंतर सरकारने यावर्षी जानेवारीमध्ये रेशन कार्ड बंधन कारक केले होते. त्यामुळे आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. रजिस्ट्रेशनच्या वेळी, रेशनकार्डचा नंबर पोर्टलवर नोंदविला जाईल. रेशनकार्डवर रजिस्टर्ड असलेल्या कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच किसान सन्मानचे पैसे दिले जातील.

PM Kisan Registration 2022 Apply for Rs 2000 at pmkisan.gov.in

याशिवाय या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत आता शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन केल्यानंतर जमिनीची कागदपत्रे, बँक पासबुक, रेशनकार्ड, आधार कार्ड आणि डिक्लेरेशनची हार्ड कॉपी कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये द्यावी लागणार नाही. आता या सर्व पेपर्सची पीडीएफ फाईल पीएम किसान पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

PM Kisan eKYC, KYC update, Last date, OTP Solution

आता सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. PM Kisan पोर्टलवर उपलब्ध असलेल्या लिंकवरून शेतकऱ्यांना घरबसल्या ई-केवायसी ऑनलाइन करता येईल. मात्र यासाठी त्यांच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असावे लागेल. याशिवाय शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवरुनही ई-केवायसी करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

हे पण वाचा : 

PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा

Bamboo Farming : सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!

Bank Holidays : जूनमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा

2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा