मुंबादेवी मध्ये गणपतीचं बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण

woman beaten up by mns workers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबादेवी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका महिलेला बेदम मारहाण (woman beaten up by mns workers) करण्यात आली आहे. गणपतीचे बॅनर लावण्यावरून या महिलमध्ये आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद (woman beaten up by mns workers) झाला. त्यानंतर महिलेला धक्काबुक्की (woman beaten up by mns workers) करण्यात आली. पीडित महिला प्रकाश देवी याच्या मेडीकल समोर मनसे कार्यकर्ते खांब उभं करून बॅनर लावत होते. महिलेने याला विरोध केला असता तिला मारहाण (woman beaten up by mns workers) करण्यात आली. यावेळी महिलेला शिवीगाळदेखील करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
पीडित महिला प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल आहे. त्यासमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब रोवण्यात येत होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे आणि त्यांचे साथीदार बल्ली रोवत होते. त्यातील एक बल्ली प्रकाश देवी यांच्या मेडिकलसमोरही रोवण्यात येत होती. त्याला त्यांनी कडाडून विरोध केला. तसेच ही बल्ली, लाकडी खांब काढून घेण्याची मागणी केली. त्यावरुन वाद वाढला. यानंतर मनसे कार्यकर्त्याने वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावली. तिला धक्काबुक्की (woman beaten up by mns workers) केली. यामध्ये ती महिला दोनदा खाली पडली. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

महिलेच्या कानाखाली लगावली
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, मनसेचे मुंबादेवी परिसरातील विभाग प्रमुख विनोद अरगिळे यांनी पीडित महिलेला कानाखाली (woman beaten up by mns workers) लगावली आहे. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. महिलेने त्याला कानाखाली मारण्याचे कारण विचारले असता अरगिळे यांनी महिलेला धक्का दिला. काही लोकांनी मध्यस्थी केली. पण दोघांमधील वाद पुन्हा वाढला. त्यावेळी महिलेला पुन्हा धक्का (woman beaten up by mns workers) दिल्याने ती खाली पडली. या प्रकारावरून विनोद अरगिळे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय