ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ऑक्टोबर महिना उजाडला तरी राज्यातील परतीचा पाऊस काय थांबायचे नाव घेईना. अजूनही राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडली (lightning strikes) असल्याच्या घटना कानावर येतात. अशीच एक घटना ठाण्यातील शहापूर तालुक्यात घडली आहे. यामध्ये वीज पडल्यामुळे (lightning strikes) एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
मृत महिलेचे नाव मंदा तुकाराम वेखंडे असे आहे. त्या ठाण्यातील शहापूर तालुक्यातील जांभे या गावच्या रहिवाशी होत्या. त्या 45 वर्षांच्या होत्या. मंदा वेखंडे या शेतावर काम करत असताना अचानक विजेसह (lightning strikes) पावसाला सुरूवात झाली. यावेळी त्यांनी धावत जात बाजूलाच असलेल्या एका झाडाचा आधार घेतला. मात्र, त्या झाडाखाली येऊन थांबल्या त्याच क्षणी त्यांच्या अंगावर वीज (lightning strikes) पडली.
यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शहापूर आसनगाव येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जांभे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंदा वेखंडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते रवी लकडे यांच्याकडून करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय