मंदिरात पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली महिला; नागरिकांकडून दोघांना मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजस्थान : वृत्तसंस्था – गंगारार येथील सरनेश्वर महादेव मंदिराच्या ओसरा पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्याचा व्हिडिओ काढून काही लोकांनी अनैतिक संबंधांचा आरोप करत मारहाण केली होती. यासोबत पुजाऱ्याला मारहाण करीत असताना मंदिरात उपस्थित असलेल्या महिलेचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला होता. यामध्ये काही लोकांनी तिचे कपडे ओढून तिला मारहाण केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर या महिलेने पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रसाद गोयल यांच्याकडे तक्रार दाखल केली. ज्या लोकांनी हा व्हिडिओ वायरल केला त्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी या महिलेने केली आहे. पीडितेने सुमारे 6 ते 7 जणांची नावे घेतली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं की, पुजारी कुटुंब आणि त्याचे कुटुंब यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यांनी पुजारीच्या पत्नीसह मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली होती.

या दरम्यान पुजाऱ्याची पत्नी तेथे उपस्थित नव्हती. ती त्यांची वाट पाहत होती. दरम्यान, अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांना खोलीत बंद करून मारहाण केली. त्यांनी तिचे कपडे ओढून तिचा अपमान केला. या घटनेचा व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.या सर्व प्रकारामुळे तिच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. या पीडित महिलेने सांगितले कि, तिचा पती चांगल्या पदावर काम करतो. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. तसेच जर तिला न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून कारवाईची वाट पाहतील.